logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आष्टा येथे प्रा.श्री राजेंद्र ना नामदेवराव केशवे सरांचा अभिष्टचिंतन सोहळा भव्यतेने साजरा...

माहूर तालुक्यातील आष्टा (ता. माहूर, जि. नांदेड) येथील श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रा. श्री. राजेंद्र नामदेवराव केशवे सर यांचा अभिष्टचिंतन सोहळा स्नेहपूर्ण वातावरणात साजरा झाला. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन सरांना दीर्घायुष्य, सुदृढ आरोग्य व यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या."प्रा. केशवे सर हे विद्यालयाचे आदर्श शिक्षक आहेत. त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांना नव्या वर्षात भरपूर सुख-शांती लाभो, हीच आमची प्रार्थना," असे विद्यालय प्रमुखांनी सांगितले. सोहळ्यात शिक्षक मंडळींनी फुलांचा हार घालून व शुभेच्छा पत्रिकेच्या माध्यमातून त्यांचे कौतुक केले. हा सोहळा विद्यालयातील सौहार्दाचे प्रतीक ठरला.

11
2006 views

Comment