logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गर्दीचा फायदा घेऊन हातातील सोन्याची बांगडी लांबविली

बसस्थानकात चोरीची घटना; पोलिसांत गुन्हा

जळगाव : नवीन बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार, ९ मार्च रोजी दुपारी १:४० च्या सुमारास फिर्यादी लीला जगदीश पाटील (रा. धनवाडी, ता. चोपडा) या नवीन बसस्थानकावरून चोपडा येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होत्या या दरम्यान चोपडा बसमध्ये चढत असताना अचानक गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी हातचलाखीने काढली. चोरी लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. याप्रकरणी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तपास पोलिस नाईक रूस्तम तडवी हे करत आहेत.

1
59 views

Comment