logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चिखली तालुक्यातील भानखेडे येथील गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योग संशोधनाची दखल महाराष्ट्र राज्य स्तरावर...

मन्सूर शहा धोत्रा .भनगोजी चिखली.:--- 2008 साली महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री एस. एम. कृष्णा यांनी महाराष्ट्रातील संशोधनाला चालना मिळावी यासाठी "आविष्कार" ही स्पर्धा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही स्पर्धा UG, PG, आणि PPG (Ph.D) या तीन गटांमध्ये जिल्हास्तर विद्यापीठ स्तर आणि आंतर विद्यापीठ स्तर (महाराष्ट्र राज्य स्तर) या तीन स्तरावर आयोजित केली जाते. यावर्षी सुद्धा अठराव्या आविष्कार स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री आचार्य देवव्रत यांच्या आदेशान्वये करण्यात आली. या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली, ता. चिखली जि. बुलढाणा या संशोधन केंद्राचे अर्थशास्त्र विषयाचे संशोधक विद्यार्थी प्रमोद विश्वनाथ पंडीत यांनी डॉ. सुनिता महादेव कलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली PPG (Ph.D) आपला संशोधन प्रकल्प बुलढाणा जिल्हा स्तरावर सादर केला यामध्ये त्यांच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळून त्यांची निवड विद्यापीठ स्तरावर करण्यात आली. दिनांक 30 व 31 डिसेंबर 2025 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये त्यांच्या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळून त्यांच्या प्रकल्पाची निवड आंतर विद्यापीठ स्तरावर म्हणजेच महाराष्ट्र राज्य स्तरावर झाली आणि त्यांना विद्यापीठ स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या 'कलरकोट' ने सन्मानित करण्यात आले 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत 18 वी राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील 26 विद्यापीठांनी सहभाग घेऊन UG, PG, PPG (Ph.D) या ग्रुप मधून 910 संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केले यामध्ये प्रमोद विश्वनाथ पंडीत यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची Ph.D ग्रुप मधून पहिल्या दहा प्रकल्पामध्ये निवड झाली त्यांना या प्रकल्पासाठी डॉ. सुनिता कलाखे, डॉ. प्रदिप बारड, आणि भानखेड येथील पोलीस पाटील मिलिंद इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रमोद विश्वनाथ पंडीत यांचे या यशाबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे .

1
46 views

Comment