logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लातूर - अहमदपूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती सुरज पाटील यांनी स्वीकारला पदभार

लातूर -विशेष प्रतिनिधी शिवाजी श्रीमंगले (AIMA) .अहमदपूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती सुरज पाटील यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कामाचा धडाका सुरू केला आहे. पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती पदी निवड झाल्यानंतर सुरज बाबासाहेब पाटील यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न लावता पंचायत समितीमधील विविध विभागाचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पहिली आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेत उपस्थित कर्मचाऱ्यांची ओळख करून घेतली.
यावेळी मार्गदर्शन करताना सभापती सुरज पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, अहमदपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. पंचायत समितीचे कार्यालय हे सर्वसामान्यांसाठी कायम खुले राहिले पाहिजे आणि शासनाच्या प्रत्येक लोकोपयोगी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रशासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.
नवनिर्वाचित सभापतींनी पदभार स्वीकारताच तातडीने कामकाजाला सुरुवात केल्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या आशा-अपेक्षा उंचावल्या आहेत. सुरज पाटील यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटेल आणि तालुक्याचा विकास गतिमान होईल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
जन जन की आवाज सोशल मीडिया. शिवाजी श्रीमंगले. विशेष प्रतिनिधी, लातूर , ( महाराष्ट्र )

11
287 views

Comment