logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तालुकास्तरिय पशुपक्षी प्रदर्शनी यशस्वी

तालुकास्तरिय पशुपक्षी प्रदर्शनी यशस्वी

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती भंडारा व जिल्हा परिषद भंडारा च्या वतीने तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मागे शहापूर येथे यशस्वी करण्यात आले.
त्यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन दुग्ध सभापती एकनाथ फेंडर यांच्या हस्ते करण्यात आले. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय भंडारा जिल्हा उपायुक्त डॉ. विलास गाडगे, पंचायत समिती सभापती सौ. कल्पनाताई कुर्झेकर, उपसभापती नागेश भगत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विवेक नखाते, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा, आरोग्य समिती जि.प. सदस्या आशाताई डोरले, आरोग्य समिती व स्थायी सदस्य प्रेमभाऊ वनवे, पंचायत समिती सदस्य संजय बोंद्रे, पं.स. सदस्य विलास लिचडे, शहापुर ग्राम पंचायत सरपंच सौ. मंगलाताई देवगडे, खोकरला ग्राम पंचायत सरपंच सौ. वैशाली सार्वे, पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रमोद हुमणे, जि.कृ.रे. अधिकारी डॉ. शैलेंद्र पुरी, भंडारा स.आ.प.स. चे डॉ. प्रशांत गेडाम, प.वि.अ. ता. जि.प. च्या डॉ. लिना पाटील, प.वि.अ. (गट-ब) पं.स. भंडाराचे सि. पी. रहांगडाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करून पशुपक्ष्यांची. प्रदर्शनीचे अवलोकन करून उत्कृष्ट पशुपक्ष्यांच्या मालकाला योग्य बक्षीस (पारितोषिके) देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी तालुक्यातील गोपालकांना विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
पशुपक्ष्यांची नोंदणी केल्या नंतर त्यांचे परिक्षण करून उत्कृष्ट पशुपक्ष्यांची गटानुसार निवड करण्यात आली. त्यामध्ये तालुक्यातील पशुपालकांनी आपले पशु आणले होते. प्रदर्शनस्थळी सहभागी पशुंच्या पालकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन पशुंच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीधर वैद्य व प्रास्ताविक डॉ. विलास गाडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रविण वैद्य यांनी मानले.
तालुका स्तरिय पशुपक्षी प्रदर्शिनीला यशस्वी करण्यासाठी डॉ. सुरेश निपाने, आर. एन. मडावी, डॉ. मुकेश कापगते, डॉ. स्नेहा मेश्राम, अजय चामलाटे, प्रविण आर. वैद्य, कु. माधुरी बांबोडे, धनिराम शहारे, पुरुषोत्तम भरे, डॉ. अनिरुध्द पाठक, डॉ. मिना चिमोटे, डॉ. शुभम गुर्वे, माधवराव मानकर, श्री. जी.आर. कंगाले, हितेश गायधने इत्यादी कर्मचारी व समस्त पशुसंवर्धन विभाग व पं.स. व जि.प. कर्मचारी सेवादाता पं.स. व जि.प. भंडारा यांनी सहकार्य केले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
257 views

Comment