logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा ! बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा !
बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड (प्रतिनिधी)

मातंग समाजातील विद्यार्थीनी कु. आकांक्षा मुंजाजी गायकवाड हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असून या प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक ७ मार्च २०२६ रोजी गुन्हा नोंद क्र.२०२/२०२६ रात्री उशिरा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८, २२३ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारित २०१५ कलम ३(२)(व्हिए) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात जीवन पाटील घोगरे (रा. रुपचंद नगर, नांदेड) याचे नाव आरोपी म्हणून नोंदविण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. आपल्या घरात अनधिकृत वसतिगृह चालविणारे आरोपी जीवन पाटील घोगरे तसेच त्याच्यासोबत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणाची नि:ष्पक्ष आणि सखोल चौकशी करुन दोषींना न्यायालयीन प्रक्रियेतून कठोरात


कठोर शिक्षा मिळवून द्यावी. तसेच पीडित कुटुंबाला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष शासकीय आर्थिक मदत समाज कल्याण विभागामार्फत तातडीने मिळवून देण्यात यावी. तसेच घटनेचा संपूर्ण तपास पारदर्शकपणे व्हावा यासाठी मुलीच्या मोबाईल फोनची तपासणी करून मागील एक महिन्याचा कॉल रेकॉर्ड तपासावा, ती राहत असलेल्या हॉस्टेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि पोस्टमार्टम अहवाल पूर्णपणे पारदर्शकपणे जाहीर करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर बहुजन समाज न्यायासाठी उभा आहे. आकांक्षा गायकवाड प्रकरणात जर प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई केली नाही, तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
या निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे, जिल्हा प्रभारी ॲड. शंकरराव कापसे, लोकेश कांबळे, सटवाजी सोनकांबळे, शिवाजी सोनटक्के, जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे, जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे, जिल्हाध्यक्षा (उत्तर) मायाताई पाटील, नांदेड महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर, उपाध्यक्ष गोविंद वाघमारे, महासचिव महेश गायकवाड, सचिव स्वप्निल कापसे, कोषाध्यक्ष नारायण घुले, विजय नवसागरे, मुकुंदा खंदारे, रमेश लोणे, दिलीप जमदाडे, उत्तम खंदारे आदींच्या सह्या आहेत.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
187 views

Comment