उपोषणकर्त्यांच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर योजनेसाठी असलेल्या राखीव निधीचा गैरवापर झाला असून, समाजमंदिर बांधकाम निकृष्ट व अपूर्ण राहिले आहे.
माहूर तालुक्यात दलित निधी गैरवापरप्रकरणी आमरण उपोषण; उपसरपंचांसह ग्रामस्थांचा चौकशीची मागणीमाहूर, दि. १० (प्रतिनिधी): ता. माहूर येथील मौजे गुंडवळ गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना (२०२२-२३) अंतर्गत दलित वस्तीच्या राखीव निधीचा जाणीवपूर्वक गैरवापर झाल्याचा आरोप करत उपसरपंच राहुल सतपाल कांबळे, विठ्ठल प्रेमसिंग राठोड आणि मोहन कनिराम आडे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू झाले. उपोषणकर्त्यांनी आज मंगळवारी (१० मार्च २०२६) तहसील कार्यालयासमोर ठिय्या बसवला असून, अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे समाजमंदिर बांधकाम तपासून अनुसूचित जाती/जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocities Act) संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेऊन चौकशी प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा आहे. ग्रामस्थांनी उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली. या घटनेमुळे माहूर तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे.