*भुसावल येथे भारतीय बौद्ध महासभे च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा*
*भारतीय बौद्ध महासभे च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा*
The Buddhist society of India तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत जळगाव जिल्हा कमिटीच्या अंतर्गत भुसावळ शहर शाखा अध्यक्ष सुरेखाताई सतिश तायडे यांच्या नेतृत्वात प्रमिलाताई किशोर भालेराव जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ शहर कार्यकारिणी वतीने 8 मार्च रोजी गौतम बुद्ध विहार कंडारी, भुसावळ येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
प्रथम तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना पुष्पहार,दिप,धूप प्रज्वलित करून विहारातील बालिकांसोबत सामुहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील निकम सर यांनी सादर केले.
उपस्थित असलेल्या माता-भगिनी तसेच बालिकांचा सत्कार करण्यात आला.जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई किशोर भालेराव यांनी माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. सुरेखाताई तायडे भुसावळ शहर शाखा अध्यक्ष यांनी सुद्धा जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता-भगिनींना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. सुनील निकम सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मध्ये मनीषाताई निकम,प्राची ताई शेळके, सुनिता ताई सोनवणे यांची भुसावळ शहर शाखेमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सदर प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी प्रमिलाताई किशोर भालेराव जळगाव जिल्हा अध्यक्ष, संजय भीमराव गुरचळ जिल्हा संघटक, अध्यक्ष,सागर चांगो सावळे भुसावळ तालुका उपाध्यक्ष,प्रमिलाताई संजय गुरचळ भुसावळ तालुका सचिव, सुरेखाताई सतीश तायडे भुसावळ शहर शाखा अध्यक्ष,मनीषाताई संदीप तायडे यावल तालुका उपाध्यक्ष , संदीप तायडे यावल तालुका कोषाध्यक्ष, रेखाताई पांडव भुसावळ शहर शाखा विहार समन्वयक, तसेच भुसावळ शहरातील उपासक उपासिका बाल बालिका यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषाताई निकम, सुनील निकम सर तसेच भुसावळ शहरातील कंडारी परिसरातील उपासक उपासिका यांचे सहकार्य लाभले.