logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महिला दिन उत्साहात साजरा : “स्त्री म्हणजे सृष्टीची जननी” — प्रा. डॉ. मंगल खेडेकर

रिसोड : उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रिसोड येथे लैंगिक शोषण प्रतिबंधक समिती, सांस्कৃতিক समिती व एनएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी केले.
महिला दिनानिमित्त महाविद्यालयात पोलीस स्टेशन येथील योगिता भस्मे यांनी स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन केले. त्यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवून प्रत्यक्ष संकटसमयी कसे सावध राहावे याचे मार्गदर्शन केले. तसेच महिलांसबंधी कायद्यात झालेले काही नवे बदल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. “स्त्री ही त्याग, धैर्य आणि भविष्य घडविण्याची मूर्ती आहे,” असेही त्या यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगल खेडेकर यांनी “स्त्री म्हणजे सृष्टीची जननी, संस्कारांची शिल्पकार आणि समाजाला दिशा देणारी शक्ती” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पूजा पाठक यांनी करून स्त्रियांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. ए. जी. वानखेडे यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाद्वारे स्त्रियांच्या हक्कांची भक्कम पायाभरणी केली असल्याची आठवण करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रियदर्शनी देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनवर, डॉ. काळे, प्रा. प्रजापती, श्री ओकार पुरी, प्रा. संदीप जुनघरे, प्रा. राम जुनघरे, प्रा. राऊत, प्रा. वाघ, नरवाडे ताई व हिंगमिरे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला प्रा. टिकार, प्रा. डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. डॉ. मेश्राम यांसह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी–विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

14
1949 views

Comment