logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ एमआयडीसी हादरले! ‘श्री गणेश केमिकल्स’ कंपनीत भीषण आग; रासायनिक ड्रमचे स्फोट, २ किमी परिसर दणाणला

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसी परिसरातील श्री गणेश केमिकल्स कंपनीत सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. कंपनीत मोठ्या प्रमाणात रासायनिक साठा असल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि रासायनिक ड्रमचे एकामागोमाग एक मोठे स्फोट होऊ लागले.
या भीषण स्फोटांचा हादरा तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत परिसरातील कंपन्यांना जाणवला. स्फोट इतके जोरदार होते की संपूर्ण आनंद नगर एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटांमुळे कंपनीतील रसायने बाहेर रस्त्यावर पसरली आणि काही ठिकाणी रस्त्यावरही आग लागल्याचे दिसून आले.
आगीचा वेग प्रचंड वाढल्यामुळे शेजारील काही कंपन्यांनाही आगीची झळ बसली. त्यामुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात एकच आहाकार आणि धावपळ उडाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच एमआयडीसी अग्निशमन केंद्राने जिल्ह्यातील विविध महापालिका व औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलांकडून तातडीने मदत मागवली.
अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान या दुर्घटनेत नेमके किती जण जखमी झाले किंवा अडकले आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस व आपत्कालीन यंत्रणा तैनात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

0
100 views

Comment