logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Breking सोलापूरचा पारा वाढला.. 💥

सोलापूरमध्ये उन्हाचा पारा वाढला, तापमानाच्या पाऱ्याने-
चाळिशी ओलांडली. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सोलापूर शहर पोलीस प्रशासनाने सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शहरातील सर्व सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन नागरिकांना भर उन्हात ताटकळत थांबावे लागणार नाही. सिग्नल जरी बंद असले तरी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस तैनात असतील.
उन्हाळ्यातील कडक ऊन आणि ट्रॅफिकचा प्रवास अधिक कष्टदायक बनवतात. वाढत्या उष्णतेत ट्रॅफिकमध्ये अडकणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा वेळी हायड्रेटेड राहणे.सुती कपडे वापरणे आणि शक्य असल्यास गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे हा उत्तम पर्याय आहे.

By krishna ingole

13
760 views

Comment