logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अध्यापक विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

ताराचंदजी निखाडे अध्यापक विद्यालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती माता, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, मां जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. लीलावती सुपारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य खेमराज पी.राऊत, प्रा. नीता टी टेंभरे, अश्विनी खलोदे व डीएलएड प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी,शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्याकरिता निबंध स्पर्धा प्रश्नमंजुषा घेण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी महिला सशक्तीकरण या विषयावर भाषणे, कविता आणि मनोगते सादर केली. काही विद्यार्थ्यांनी महान महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा संदेश दिला. तसेच समाजातील महिलांचे स्थान, त्यांचे संघर्ष आणि त्यांचे कर्तृत्व प्रभावीपणे मांडण्यात आले.
यावेळी प्राचार्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, साहित्य, प्रशासन आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले. महिलांना समान संधी व सन्मान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात समानतेचा संदेश देत कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण केला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. जी जी इंदुलकर ,रामगोपाल कापगते राजेंद्र मांदाडे धनपाल घरडे ,लखन भोयर,चौधरी, एन बी भगत, विजया पडोळे ,शीला पडोळे ,रहिमतकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी डी आर झोडे ,आनंद गायकवाड ,भुरे राजानंद मेश्राम व डि.एल.एड प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन कु. स्वाती बावनकुळे हिने केले तर आभार प्रदर्शन निकिता लंजे हिने केले.

82
2380 views

Comment