logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आमदार अमित भाऊ झनक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन

आमदार अमित भाऊ झनक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन आज गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
बाळखेड फाटा ते लेहाणी हा रस्ता गावासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर रोजचा प्रवास होत असतो. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाची मागणी गावकऱ्यांकडून केली जात होती. आता या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून शेतकरी बांधवांना शेतीमालाची ने-आण करण्यासाठी मोठी सोय होणार आहे. तसेच गावाच्या विकासाला देखील या कामामुळे नवी गती मिळणार आहे.
यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी अशा प्रकारची विकासकामे पुढेही होत राहावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

4
1045 views

Comment