logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

एका रात्रीत 08 दुकाने फोडून चोरी करणारी टोळी मिरजगाव पोलीसांकडून 12 तासांचे आत जेरबंद, एकूण 1,15,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त....

एका रात्रीत 08 दुकाने फोडून चोरी करणारी टोळी मिरजगाव पोलीसांकडून 12 तासांचे आत जेरबंद, एकूण 1,15,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 04/03/2026 रोजी सायंकाळी 08/00 वा. ते दिनांक 05/03/2026 रोजी सकाळी 09/00 वा.चे सुमारास मिरजगाव ते कडा जाणारे रोडवर, वीर पाटील कॉम्प्लेक्स मधील 8 दुकानांच्या पाठीमागील पत्रा कश्याचे तरी सहाय्याने उचकाटुन आत मध्ये प्रवेश करुन अज्ञात आरोपींनी सोलर किटचे एकुण 13 कंट्रोलर, सी.सी.टी.व्ही. कॅमेराचा डि.व्हि.आर, ड्रील मशिन, स्पॅनर सेट, ट्रॅक्टरचे टेप, स्पीकर वायर, कटर, रोख रक्कम असा मुद्देमाल स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता लबाडीच्या इरादयाने फिर्यादीचे संमती शिवाय चोरुन नेला होता. सदरबाबत अभय बाळासाहेब दळवी, रा. तिखी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध मिरजगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 74/2026 बी.एन.एस.का.कलम 331(4), 334(1), 305, 324(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत एकाच रात्रीत 08 दुकाने फोडून चोऱ्या झाल्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर मा. श्री. वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत, मा. श्री. प्रविणचंद्र लोखंडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, व मिरजगाव पोलीस स्टेशनचे तपास पथक सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि विजय झंजाड यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा मनोहर भीमराव पवार, रा. बीडसांगवी, ता. आष्टी, जि. बीड याने व त्याचे साथीदारांसह मिळून केला असून त्यानुसार मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि विजय झंजाड व तपास पथकातील अंमलदार यांनी आरोपी नामे- 1) मनोहर भीमराव पवार, रा. बीडसांगवी, ता. आष्टी, जि. बीड याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेण्यात आले.
ताब्यातील इसमाकडे सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा हा 2) अरुण रघुनाथ बर्डे, 3) काळुराम चंदु माळी, 4) ज्ञानेश्वर गंगाराम साळुंखे, 5) सुरेश बाळु माळी, 6) भास्कर बबन गांगर्डे, सर्व रा. देवीनिमगाव, ता. आष्टी, जि. बीड अशांनी मिळून केला असल्याचे सांगितले. त्यानुसार सदर इसमांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून सदर गुन्ह्याचे तपासात अटक आरोपींकडून एकूण 1,15,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे- मनोहर भीमराव पवार याचेविरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन, जि. बीड येथे गुन्हा रजि. नं. 118/2015 भा.दं.वि.कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर कामगिरी ही पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, मा. श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, मा. श्री. वैभव कलुबर्मेर्े, उपविभागिय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग मा. श्री. प्रविणचंद्र लोखंडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय झंजाड, सफौ/ शंकर रोकडे, पोहेकॉ/ गणेश ठोंबरे, पोकॉ/ सुनिल खैरे, पोकॉ/ गोकुळ पळसे, पोकॉ/ राजेंद्र गाडे, पोकॉ/ अक्षय गार्डे, पोकॉ/ बळीराम काकडे, होमगार्ड प्रशांत माने, अजय फुलमाळी, अक्षय पवार, दिपक काळे, बिभीषण रणदिवे अशांनी मिळून केली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सफौ/ शंकर रोकडे हे करित आहेत.

26
1402 views

Comment