logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

काळी दौलत येथे बोर्ड परीक्षेत बाहेरून कॉपीचा प्रकार?

महागाव तालुक्यातील काळी दौलत येथील अतहर मिर्झा शाळेत सुरू असलेल्या बोर्ड परीक्षेदरम्यान बाहेरून कॉपी पुरवली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. परीक्षाकेंद्राच्या बाहेर काही लोकांकडून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका किंवा चिठ्ठ्यांच्या माध्यमातून मदत केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे परीक्षेची पारदर्शकता आणि कॉपीमुक्त वातावरणाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित शिक्षण विभाग व प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
बोर्ड परीक्षा प्रामाणिक व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने अधिक कडक बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.


जिल्हा प्रतिनिधी
निलेश पवार

33
842 views

Comment