जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कर्मचारी /अधिकारी क्रीडा स्पर्धा थाटात सुरु.
चंद्रपूर: - जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सर्व तालुक्यातील कर्मचारी व अधिकारी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दि.6/3/2026 पासून थाटामाटात सुरु झालेल्या आहेत.
या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मान.विनय गौडा जी.सी.यांचे शुभ हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी मान.पुलकित सिंग तथा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
जिल्ह्यातील १५ तालुक्याची बहारदार झांकी यावेळी अतिशय आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आली. सायंकाळी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक महोत्सव स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये वाद्यवादन,वैयक्तिक गायन,नृत्य, सामुहिक गायन-नृत्य,तथा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
सदर स्पर्धा संपन्न होत असल्यामुळे सर्व विभागाचे कर्मचारी -अधिकारी आनंदित झाले आहेत.