नाशिकमध्ये जीएसटी विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने
नाशिकमध्ये जीएसटी विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे आणि सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांच्यासह खाजगी व्यक्ती अमित जाधव यांना 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. एका व्यावसायिकाविरोधातील कारवाईचा तपास पूर्ण करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी तब्बल 1 कोटी 25 लाखांची मागणी केली होती. तडजोडीनंतर एक कोटी रुपयांवर व्यवहार ठरला असून पहिला 20 लाखांचा हप्ता घेताना एसीबीने सापळा रचून कारवाई केली. झडतीदरम्यान पागे यांच्या कार्यालयातून 2 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. कॉल रेकॉर्डिंग आणि मागणीची खात्री झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.