logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बातमी

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नेर : जिल्हा परिषद केंद्र नेर क्र. 1 येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच शाळेतील सर्व शिक्षिका, शिक्षक, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महिला सशक्तीकरणावर भाषणे, कविता आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी महिलांच्या समाजातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात महिलांबद्दल आदर व जागरूकता निर्माण झाली. व मुख्याध्यापक यांनी आभार मानले.

— प्रतिनिधी
यशवंत शिंदे.

4
650 views

Comment