बांबरुड राणीचे येथील डॉ .राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा...!
बांबरुड राणीचे येथील डॉक्टर राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पाचोरा प्रतिनिधी:-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
याप्रसंगी राजमाता जिजाऊ माॅसाहेब, पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी,भारताची कोकीळी लतादिदी मंगेशकर अशा थोर महिला यांच्या प्रतिमांचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही.पाटील सर पर्यवेक्षक नितीन पाटील सर यांच्या उपस्थितीत आज दि.८ मार्च रोजी सकाळी डॉ राम मनोहर लोहिया विद्यालयात "जागतिक महिला दिवस" साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माता उपस्थित होत्या त्यांचा सत्कार व स्वागत विद्यालयातील महिला शिक्षिका श्रीमती उर्मिला सोनवणे, श्रीमती वैशाली वाघ, श्रीमती सुजाता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जागतिक महिला दिन या विषयावर विद्यालयातील विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सुजाता सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या साठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.