logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर; १५ मार्चला राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर;

कुणाल लाडे, संदेश साळुंके ,शाहिद पठाण, रुपेश बाजड,राहुल पवार,स्वप्निल कांबळे, ईश्वर महाजन,महेंद्रसिंग गिरासे,भारत सवणे,विनोद कांबळे,लियाकत पठाण,सारिका शिंदे,संदीप पिंपळकर,महेश जगताप,मल्हारी ओमासे पुरस्काराचे मानकरी
१५ मार्चला राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण


मुंबई: पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ च्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार’ आज जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, संचालक तथा संयोजक गोरक्षनाथ मदने आणि राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी आज या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. सकारात्मक पत्रकारितेचा जागर व्हावा आणि समाजात क्रांती घडवून आणणाऱ्या बातम्यांना बळ मिळावे, या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून या पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. राज्य शासन आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
येत्या १५ मार्च रोजी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे मंत्री मंगलप्रसाद लोढा आणि अमृता फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते वाय बी चव्हाण येथे सायंकाळी ५ वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावर्षी या पुरस्कारांसाठी राज्यभरातून तब्बल ६०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामधून प्रत्येक विभागातील एका जिल्हा आणि एका तालुका स्तरावरील एकूण १५ पत्रकाराची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यांमध्ये कोकण विभागातून कुणाल लाडे (डहाणू) व संदेश साळुंके (रायगड), विदर्भ विभागातून शाहिद पठाण (गोंदिया) व रुपेश बाजड (वाशिम), पश्चिम महाराष्ट्रातून राहुल पवार (कराड) व स्वप्निल कांबळे (राधानगरी), उत्तर महाराष्ट्रातून ईश्वर महाजन (अमळनेर) व महेंद्रसिंग गिरासे (शिंदखेडा) आणि मराठवाडा विभागातून भारत सवणे (परतूर) व विनोद कांबळे (लातूर) यांचा समावेश आहे.
विशेष विंग अंतर्गत उर्दू विंगसाठी लियाकत पठाण (नाशिक), महिला विंगसाठी सारिका शिंदे (ठाणे), साप्ताहिक विंगसाठी संदीप पिंपळकर (वाशिम), रेडिओ विंगसाठी महेश जगताप (पुणे) आणि डिजिटल विंगसाठी मल्हारी ओमासे (सांगली) यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठी १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक बातम्या व लेख प्रसिद्ध असणे अनिवार्य होते. संघटनेचे मुख्य पदाधिकारी संजय आवटे, चंद्रमोहन पुपाला, शंतनू डोईफोडे आणि दिव्या भोसले, ऍड विवेक खरे यांनी निवड समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. ७८ देशांत ४ लाख ७० हजारांहून अधिक सदस्य असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांच्या कल्याणासोबतच सकारात्मक पत्रकारितेसाठी मोठे पाऊल उचलले आहे. पत्रकारितेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा आणि सामाजिक जागृती व्हावी, याच भावनेतून हे पुरस्कार दिले जात असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले.

0
0 views

Comment