logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पत्रकार संघाच्या वतीने डॉ.आदिती सारडा आज फिनिक्स महिला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित होणार

पत्रकार संघाच्या वतीने डॉ.आदिती सारडा आज फिनिक्स महिला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित होणार

जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील पुनर्वसित झालेल्या महिलांना साडीचोळी भेट देऊन आदर्शवत जागतिक महिला दिन साजरा होणार..!

बीड प्रतिनिधी

आदित्य शिक्षण संस्था आणि द्वारकादास मंत्री बँकेच्या संचालिका डॉ. आदिती सुभाषचंद्र सारडा यांचे शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन पत्रकार संघाच्या वतीने यावर्षीचा फिनिक्स महिला प्रेरणा पुरस्कार 2026 आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात आदर्शवत उपक्रमाने प्रदान करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकाच्या वतीने वैभव स्वामी यांनी केले आहे.
बीड येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्र नवी भाजी मंडई बीड येथे आज रविवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील पुनर्वसित झालेल्या 6 महिलांना डॉ. अदिती सारडा यांच्या शुभहस्ते साडीचोळी, पुष्पगुच्छ आणि सन्मान पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बीडला आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील शैक्षणिक दालने उपलब्ध करून बीडची आदर्श शैक्षणिक ओळख निर्माण करण्यामध्ये सारडा परिवाराचे मोठे योगदान राहिले आहे. या आदित्य शिक्षण संस्थेला वटवृक्षात रूपांतरित करण्यामध्ये एक महिला असताना सुद्धा सक्षमपणे डॉ.आदिती सुभाषचंद्र सारडा यांनी आपले बंधू डॉ. आदित्य सारडा यांच्या पाठबळावर कौशल्य पणाला लावले. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि दैनिक समर्थ राजयोग यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिक्स महिला प्रेरणा पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी सामाजिक, उपक्रम प्रेमी प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने पत्रकार वैभव स्वामी यांनी केले आहे.

चौकट...
मरणासन्न अवस्थेतून पुनर्वासित झालेल्या या महिलांचा होणार सन्मान..!
रक्ताच्या नात्यांनी बेदखल केलं, महिला असताना देखील बेसहारा होऊन रस्त्यावर यावं लागलं. अशा कठीण प्रसंगात पुढे जगाव की मरण स्वीकारावं अशा अवस्थेत असताना जिव्हाळा बेघर निवारा केंद्राने दिलेली मायेची ऊब आणि नव्याने मिळालेली जगण्याची ऊर्जा यामुळे मरणासन्न अवस्थेतून पुन्हा एकदा नव्या उमेदीने जगण्यासाठी स्वकर्तुत्वावर मिळेल तिथे काम स्वाभिमानाने करून पुन्हा एकदा नव्याने उभारी घेऊन स्वकष्टावर जीवन जगत असलेल्या पुनर्वसित झालेल्या आदर्शवत महिला मध्ये श्रीमती मीनाताई शेंडगे, संगीताताई जव्हेरी, रईसा पठाण, शेख इर्शात,आशा आव्हाड आणि मनीषा वनवे या सहा महिलांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये साडीचोळी, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन पत्रकार संघाच्या वतीने आज डॉ. आदिती सारडा यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
24 views

Comment