logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

श्रीरामपुरात गावठी कट्टा-कत्तीवाला शहर पोलीसांनी पकडला...

श्रीरामपुरात गावठी कट्टा-कत्तीवाला शहर पोलीसांनी पकडला...


श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)-गावठी कट्टा विक्रीसाठी आणलेल्या एकाला श्रीरामपूर पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून एका गावठी कट्टयासह एक लोखंडी कत्ती असा ३५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोनि. देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार नवी दिल्ली, वॉर्ड नं.२ परिसरात इम्रान उस्मान पठाण, वय-३१ हा गावठी कट्टा विक्री करण्यासाठी फिरत आहे. तेव्हा देशमुख यांच्या आदेशान्वये पोलीस पथक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी गेले असता त्यांना संशयित आरोपी हा संशयास्पद फिरताना दिसला. तेव्हा त्याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी कत्तीसह गावठी कट्टा आढळून आला. सदर गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली आरोपीने दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी,जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोकों/अमोल पडोळे, पोकों/ संभाजी खरात, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोर्का/सचिन दुकळे, पोकों/अमोल गायकवाड, पोकों/रामेश्वर तारडे, पोकों/सागर बनसोडे, पोकों/रविंद्र शिंदे, पोकों/अजित पटारे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, रोशन निकम हे करीत आहेत.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
100 views

Comment