logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ओबीसींचा स्वतंत्र रकाना नाही, तर जनगणनेत सहभाग नाही ! भंडाऱ्यात ओबीसींचा धरणे आंदोलनातून हुंकार

ओबीसींचा स्वतंत्र रकाना नाही, तर जनगणनेत सहभाग नाही !
भंडाऱ्यात ओबीसींचा धरणे आंदोलनातून हुंकार

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : केंद्र सरकारने जनगणनेसाठी जारी केलेल्या राजपत्रात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना दिला नाही. त्यामुळे आता ओबीसीं विरुद्धचे षड्यंत्र खपवून घेतले जाणार नाही. जनगणनेत स्वतंत्र रकाना नसेल, तर ओबीसी जनगणनेत सहभागी होणार नाही, न्यायासाठी देशभर तीव्र आंदोलन केले जाईल असा हुंकार भंडाऱ्यात ५ मार्चला ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित एकदिवसीय धरणे आंदोलनात निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालया समोरील धरणे आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले.

*ओबीसी धरणे आंदोलनात सहभागी*

खासदार डॉ. प्रशांत पडोळे, ज्ञानेश्वर रक्षक, उमेश कार्राम, मुख्य समन्वयक सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे, रमेश शहारे, संजय मते, डॉ. बाळकृष्ण सार्वे, रोशन उरकुडे, ललीता देशमुख, मनिषा भांडारकर, वृंदा गायधने, लता बोरकर, भावना निकुडे, शुभदा झंझाड, भगीरथ धोटे, उमेश कार्राम, गोपाल सेलोकर, किसन शेंडे, धनंजय बिरणवार, विलास केजरकर, उमेश सिंगनजुडे, गुणवंत पंचबुद्धे, उमाजी देशमुख, मंगला वाडीभस्मे, संविधान संघर्ष समितीचे रोशन जांभूळकर, राजेश मडामे, ग्यानचंद जांभूळकर, असित बागडे, शालीकराम कुकडे, जीवनदास सार्वे, दिनकर काटेखाये, जयकृष्ण फेंडरकर, संजय मोहतुरे, शंकर चौधरी, मधुकर भोपे, रामचंद्र चकोले, अविनाश गायधने, कमलेश सार्वे इत्यादी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची सरकारची तयारी नाही. केंद्र सरकारला झुकविण्यासाठी सर्वांनी एकजूट व्हावे, पुढील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी खासदार पडोळे यांनी केले.

*जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद करा*

२२ जानेवारी २०२६ च्या अधिसूचनेनुसार जनगणनेत एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यात प्रश्न क्रमांक १२ मध्ये तुम्ही एससी आहात का ? तुम्ही एसटी आहात का, असे प्रश्न विचारले जातील. परंतु, ओबीसींना तुम्ही ओबीसी आहात का ? हा प्रश्न विचारला जाणार नाही. म्हणजेच ओबीसींची इतर सर्वांमध्ये नोंद केली जाईल. अनुसूचित जाती, जमातीप्रमाणे ओबीसी म्हणून स्वतंत्र नोंद होणार नाही. परिणामी ओबीसींची लोकसंख्या कळणार नाही.
आंदोलनानंतर खासदार प्रशांत पडोळे व जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
443 views

Comment