जातीनिहाय जनगणनेसाठी दिल्लीत २३ मार्चला जंतर-मंतरवर देशव्यापी आंदोलन
जातीनिहाय जनगणनेसाठी दिल्लीत २३ मार्चला जंतर-मंतरवर देशव्यापी आंदोलन
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- अनुसूचित जाती- जमातींबरोबरच ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार ऑक्टोबर २०२६ पासून जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे जनगणना सुरू करून उर्वरित देशात मार्च २०२७ पासून प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र २२ जानेवारी रोजी जनगणना आयुक्तांनी राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या ३३ प्रश्नांच्या यादीत बाराव्या क्रमांकावर केवळ अनुसूचित जाती व जमातींचा उल्लेख असून ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.
यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचा आरोप करत राष्ट्रीय ओबीसी महासंघ, BC Welfare Association, ओबीसी महासभा तसेच इतर संघटनांच्या वतीने २३ मार्च रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत जंतर मंतर नवी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात ओबीसींची स्पष्ट जातीनिहाय जनगणना करावी, यूजीसी बिल २०२६ लागू करावे, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावे तसेच १३ सप्टेंबर २०१७ पासून न वाढविलेली क्रिमिलेअरची मर्यादा वाढवून २० लाख रुपये करावी अशा प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. मागास प्रवर्ग निश्चित करतांना त्या जातीतील प्रत्येक कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थिती महत्त्वाची असतांना, प्राथमिक टप्प्यात केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धर्माचीच नोंद का केली जाणार असा सवाल ओबीसी समाजाकडून उपस्थित करण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, डॉ. अशोक जीवतोडे, प्रा. शेषराव येलेकर, शरद वानखेडे, सुभाष घाटे, डॉ. प्रकाश भागरथ, दिनेश चोखारे, रत्नमाला पिसे, महिला अध्यक्ष ज्योतीताई ढोकणे, बीसी वेल्फेअर असोसिएशनचे श्रीनिवास जाजुला व शंकरअण्णा तसेच ओबीसी महासभेचे विनय कुमार, धर्मेंद्र कुशवाह, उमेश कोरार्म यांनी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
तरी भंडारा जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी दिल्ली येथील जंतर मंतर येथे जास्तीत -जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मुकेश पुडके, समन्वयक के. झेड. शेंडे, उपाध्यक्ष सदानंद बुरडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शहराध्यक्ष अंबादास मंदुरकर, प्राध्यापक उमेश सिंगनजुडे, डॉ. आशिष माटे, आशिष वंजारी यांनी केले आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015