logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

१० वी, १२ वीच्या खेळाडूंसाठी ग्रेस मार्क्सची ऑनलाईन प्रक्रिया सुरु


१० वी, १२ वीच्या खेळाडूंसाठी ग्रेस मार्क्सची ऑनलाईन प्रक्रिया सुरु

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ ची) बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाआयटी मार्फत खेळाडूंना मिळणाऱ्या 'सवलतीच्या गुणांची (ग्रेस मार्क्स) ऑनलाईन अर्ज, प्रक्रिया आता अधिकृतपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी पात्र खेळाडूंचे अर्ज तातडीने ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती. लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे. प्रक्रियेत पारदर्शकता आणि तांत्रिक बदल क्रीडा संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर spots.maharashtra.gov.in ही लिक उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदा या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या नवीन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा आणि शाळांचा वेळ वाचणार आहे.

*अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे*

पात्र खेळाडू विद्यार्थ्यांनी अर्जासोबत काही कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. त्यात परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket): अचूक बैठक क्रमांकासाठी, विहित नमुन्यातील अर्ज फॉर्म क्रमांक १ आणि फॉर्म क्रमांक २. गुणपत्रिकाः विद्यार्थी १२ वीसाठी अर्ज करत असल्यास, १० वीची गुणपत्रिका अनिवार्य आहे. क्रीडा प्रमाणपत्रः अधिकृत क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतल्याचे वैघ प्रमाणपत्र अशी कागदपत्रे लागू शकतात.

ग्रेस माक्र्ससाठीची ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, दिलेल्या मुदतीत अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

*फोटो आणि स्वाक्षरीची कटकट मिटली*

यापूर्वी अर्ज भरताना फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी कराबी लागणारी कसरत आता करावी लागणार नाही. ऑनलाईन अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा बैठक क्रमांक (Seat Number) नमूद करताच, त्यांचा फोटो आणि स्वाक्षरी सिस्टीममध्ये। आपोआप (Auto-fetch) उपलब्ध होईल. यामुळे तांत्रिक चुकांची शक्यता कमी झाली आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी पात्र खेळाडूंचे अर्ज तातडीने ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment