logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ताराचंदजी निखाडे अध्यापक विद्यालयाची बांबू क्लस्टर येथे शैक्षणिक क्षेत्रभेट

ताराचंदजी निखाडे अध्यापक विद्यालय साकोली येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट बांबू क्लस्टर येथे उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना बांबू उद्योगाची प्रत्यक्ष माहिती मिळावी व त्यातून कौशल्याधारित शिक्षणाचा अनुभव मिळावा या उद्देशाने अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री खेमराज राऊत यांच्या मार्गदर्शनात व क्षेत्रभेट प्रमुख प्रा.रामगोपाल कापगते ,नीता टी टेंभरे,गेंदलाल इंदुलकर लीलावती सुपारे ,अश्विनी खळोदे ,राजेंद्र मांदाडे,धनपाल घरडे, गुलाबराव चौधरी, एन बी भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना बांबूपासून तयार होणाऱ्या विविध वस्तू, त्यांची निर्मिती प्रक्रिया, बांबू प्रक्रिया तंत्रज्ञान तसेच त्याचे आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बांबू क्लस्टरमधील तज्ञ क्लस्टर मॅनेजमेंट श्री सतीश पाचे व श्री इंद्रपाल राऊत मास्टर आर्टजन् यांनी विद्यार्थ्यांना बांबूच्या विविध उपयोगांबद्दल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी बांबूपासून तयार होणारे फर्निचर, सजावटी वस्तू, घरगुती उपयोगाच्या वस्तू तसेच पर्यावरणपूरक उत्पादने प्रत्यक्ष पाहिली. स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे विद्यार्थ्यांनी कौतुक केले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांविषयी माहिती मिळाली तसेच स्वावलंबन व उद्योजकतेबाबत प्रेरणा मिळाली.या क्षेत्रभेटीत विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रक्रियेचे निरीक्षण करून मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.अशा प्रकारच्या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळते आणि त्यांच्या ज्ञानात भर पडते, ही क्षेत्रभेट यशस्वी करण्याकरिता प्रा. लखन भोयर,प्रा,विजया पडोळे ,शीला पडोळे, एम जी रहिमतकर सी.टी.हत्तीमारे व शिक्षकेतर कर्मचारी डी आर झोडे ,आनंद गायकवाड , भुरे, राजानंद मेश्राम तसेच डी.एल.एड प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व छात्राध्यापक यांनी सहकार्य केले.

95
3822 views

Comment