logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र वक्फ मंडळात पुन्हा वाद; नवीन सीईओ नियुक्तीवरून राजकीय हालचालींची चर्चा

मुरुड (साकिब गजगे ) नेहमी वादग्रस्त असणारा वक्फ मंडळ पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे कारण की मंडळाकडून ठराविक लोकांची मनूपल्ली चलत असल्याचे आरोप केले असतानाच महत्त्वाचे मुद्दा समोर आला आहे ते म्हणजे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांनी पदभार काढून घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर शासनाचे वतीने महाडाचे अधिकारी फैयाज पठाण यांची नियुक्ती केल्यानंतर ही मंडळात थंड मांडून बसणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आपला पद सोडण्यास तयार दिसून येत नाही फक्त खेळी करून न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी पदभार काढण्याचे अर्ज चा नाटक केल्या असल्याचे आरोप सुद्धा लावले जात आहे तर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त झाल्यानंतर त्यांना मूळ पदावरून कार्यमुक्त ना होऊ देण्यासाठी फैयाज पठाण ज्या महाडा मध्ये कार्यरत आहे त्याचे अधिकाऱ्यांना भेटून त्यांना कार्यमुक्त करू नका अशी विनंती करणारे मंडळाचे ते दोघेजण कोण हे चर्चेचा विषय ठरल्याशिवाय राहणार नाही कारण की फैयाज पठाण रुजू झाले तर त्यांना इतर प्रकरण जे त्यांनी जाणून बुजून रखडून ठेवले आहे त्याचे निर्णय घेता येऊ शकत नाही म्हणून जाणून-बुजून त्यांना रुजू होण्याची रोखून जुनेद सय्यद आणि समीर काजी हे आपले पदाचा दुरुपयोग करून अनेक प्रकरण निकाली लागण्याचे प्रयत्न करत आहे महत्त्वाचे म्हणजे की ज्या प्रकरणाचे सुनवाई घेतले जात आहे त्यामध्ये अनेक प्रकरणात मंडळ मेरीट न तपासता फक्त वशिलेबाजी किंवा राजकीय नेत्यांचे दडपणाखाली निर्णय घेण्याचे दाखवून आपले साध्य करून घेण्याचे काम करत असल्याची चर्चा ठरत असून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अध्यक्ष समीर काजी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांची मनूपल्ली चलच असल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही कारण की केंद्राचे व कायदा लागू झाल्यानंतर मंडळ बरखास्त होणे गरजेचे असताना आजपर्यंत महाराष्ट्र राज्य मंडळ का बरखास्त करण्यात आला नाही हे चर्चा होत आहे तरी केंद्राकडून मंडळाला याबाबत पत्र सुद्धा पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे जे मंडळांनी दाबून ठेवल्याचा आरोप केले जात आहे तर दुसरीकडे राज्य शासनाकडून ही मंडळाचे रिक्त पद भरण्याबाबत हालचाली सुरू असताना धडाधड बैठकी घेऊन निर्णय निकाली लागण्याचे प्रयत्न केले जात आहे महत्त्वाचे म्हणजे बैठकीत हाश्मीसारखे सदस्य सुद्धा उपस्थित राहत नाही आणि अपुरे मंडळ असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांचे उपस्थितीत बैठक घेऊन अवैधरित्या प्रकरण मार्गी लावण्याचे षडयंत्र केले जात आहे ज्या विरोधात लढा उभा करणे व न्यायालयात दाद मागणे गरजेचे दिसून येते

12
1833 views

Comment