logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बीड पालिकेचा ‘कारभार’ की दलालांचा ‘दरबार’? — दलाल आणि कर्मचाऱ्यांच्या जुगलबंदीवर प्रश्नचिन्ह

बीड | प्रतिनिधी

बीड नगरपालिकेतील कारभाराबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पालिकेच्या कामकाजात काही दलालांचा वाढता हस्तक्षेप आणि काही कर्मचाऱ्यांशी त्यांची कथित जुगलबंदी असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दलाल सुरज कदम आणि पालिकेतील सफाई कामगार धनवे यांची पालिकेत ‘जुगलबंदी’ सुरू असल्याची चर्चा आहे. विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून दलालांमार्फतच कामे केली जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. यामुळे पालिकेतील अधिकृत प्रक्रियेला बगल देत काही जणांचा ‘दरबार’ चालतो आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

या प्रकरणात कर अधीक्षक तिडके यांची भूमिका देखील चर्चेत आली आहे. इतक्या चर्चेनंतरही प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया किंवा कारवाई दिसून येत नसल्याने “कर अधीक्षक तिडके गप्प का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लक्ष वेधत सवाल उपस्थित केला आहे की, “बीड नगरपालिका दलालांनी दत्तक घेतली आहे का?” जर अशा प्रकारे दलालांचा हस्तक्षेप वाढत असेल तर यावर तातडीने कारवाई करून पारदर्शक प्रशासन देण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

आता या सर्व चर्चांनंतर मुख्याधिकारी आणि पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेतात, आणि संबंधित प्रकरणाची चौकशी होते का, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

20
1272 views

Comment