केंद्राकडून ₹1409 कोटी मंजूर; तरीही रोजगार हमी मजुरांची मजुरी प्रलंबित
पैसे आले तरी मजुरांच्या खात्यात जमा नाही; प्रशासनावर प्रश्नचिन्ह....
अहिल्यानगर / प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत काम केलेल्या मजुरांची मजुरी अद्याप प्रलंबित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी सुमारे ₹1409 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती अधिकृत पत्रातून स्पष्ट झाली असतानाही, प्रत्यक्षात अनेक मजुरांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
आयुक्त, रोजगार हमी योजना महाराष्ट्र यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रानुसार 27 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र शासनाने ₹1409 कोटींचा निधी राज्याला मंजूर केला असून अकुशल मजुरांची मजुरी तातडीने वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तरीसुद्धा डिसेंबर महिन्यापासून अनेक मजुरांची मजुरी प्रलंबित असल्याची तक्रार ग्रामीण भागातून येत आहे. नियमांनुसार रोजगार हमी योजनेत मजुरांना 15 दिवसांच्या आत मजुरी देणे बंधनकारक असताना महिनोन्महिने पैसे न मिळाल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ग्रामीण मजुरांचे म्हणणे आहे की, “काम केले, हजेरी लावली; पण मेहनतीचे पैसे अजून मिळाले नाहीत. सण-उत्सव आले तरी हातात पैसे नाहीत.”
दरम्यान, केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही मजुरांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच सर्व थकीत मजुरी तात्काळ वितरित करावी, अशी मागणी मजुरांकडून होत आहे.
#रोजगारहमी
#मनरेगा
#थकीतमजुरी
#ग्रामीणमजूर
#मजुरांन्यायमिळवा
#ग्रामीणविकास
#शेतकरीआवाज
#महाराष्ट्र
#ReleaseMGNREGAWages
#JusticeForWorkers
#PayWorkersNow