स्व. पूर्वेश दुरगकर अमर रहे..!
स्व. पूर्वेश दुरगकर अमर रहे..!
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- नागपूर जिल्ह्याचे सुपुत्र व भारतीय वायुसेनेचे अधिकारी फायटर पायलट पूर्वेश दुरगकर यांचा दिनांक ५ मार्च २०२६ ला सराव दरम्यान सुखोई विमानाच्या दुर्घटनेमध्ये वीर मरण आले. त्यांचा मृत आत्मास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर व सर्व DSA, शहापूर परिवार यांनी व्यक्त केली आहे.
लहानपणापासूनच भारतीय वायुसेनेची आवड असलेले पूर्वेश दुरगकर यांनी SGB डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, शहापूर येथून वर्ग ११ वी व १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर AFCAT परीक्षेच्या माध्यमातून पूर्वेश यांनी वायुसेनेत अधिकारी पद मिळविले. त्यांच्या भारतीय सेनेमध्ये निवड होण्याच्या बातमीचा आनंद संपूर्ण डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, शहापूर मध्ये एक उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला होता.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी शहापूर मध्ये पूर्वेश यांचा मोठा सत्कार झाला. पूर्वेश यांनी आपल्या सेवेत देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ऑपरेशन सिन्दुर कर्तव्य बजावले. पाकिस्तानमध्ये घुसून रावळपिंडीचा दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
सुट्टीमध्ये गावी आल्यानंतर पूर्वेश नेहमी डिफेन्स सर्विसेस अकॅडमी शहापूरला भेट देत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत. त्यांचा अधिकारी बनण्याचा प्रवास आवर्जून विद्यार्थ्यांना ते सांगत असत. ज्यातून हजारो विद्यार्थ्यांना भारतीय सेनेत अधिकारी होण्यासाठी प्रेरणा मिळायची.
डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी शहापूर संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये पूर्वेश दुरगकर यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जात होते.
मात्र एवढ्या लवकर आनंद हा दुःखामध्ये बदलून जाईल. याचा विचार सुद्धा कधी केला नव्हता. आज डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी शहापूर मधील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक- कर्मचारी यांच्या डोळ्यात या दुःखाने पाणावले आहेत. सर्व संस्थेत एक शोककळा पसरली आहे.
पूर्वेश यांचे शौर्य कायम स्मरणात राहील आणि SGB डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, शहापूर संस्था पूर्वेश यांचे नाव नेहमीच अभिमानाने घेत राहील.
फायटर पायलट पूर्वेश दुरगकर यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो, हीच प्रार्थना प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर व सर्व DSA, शहापूर परिवार यांनी व्यक्त केली.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015