logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री भागवत कथा ज्ञानयज सोहळा आळंदी ग्रामस्थ कुऱ्हाडे परिवार

येथे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा; कीर्तन-भजनांनी भक्तिमय वातावरण
आळंदी (पुणे) :
कै. गं. भा. विमल (काकू) गोपाळ पाटील कुन्हाडे (मा. चेअरमन, विवि. का. सो. आळंदी) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आळंदी देवाची येथे संगीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा १० मार्च २०२६ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
या सोहळ्याचे कथा प्रवक्ते व भागवताचार्य ह.भ.प. श्री सिदाम महाराज काळे हे असून त्यांच्या ओजस्वी वाणीमधून श्रीमद्भागवत कथेचे निरूपण होणार आहे. त्यांच्या कीर्तनरूपी सेवेतून भाविकांना अध्यात्मिक ज्ञान व भक्तिरसाचा लाभ मिळणार आहे.
तसेच या कार्यक्रमात विविध नामवंत कलाकारांच्या संगीत भजन व संतवाणी सेवा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये श्री ऋषिकेशजी पाटील, श्री विष्णूबा सोळुंके, सौ. ज्योतीताई गोराणे धावेकर, प्रसिद्ध भजनसम्राट पंडित कल्याणजी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड, प्रसिद्ध गीतकार भजनसम्राट ज्ञानेश्वर मेश्राम यांचा समावेश आहे.
याशिवाय अमृतपूर्व संतवाणी गायक पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी, शुभम खंडाळकर व सुरजन खंडाळकर (पुणे) हे देखील आपल्या संतवाणी व भजनाच्या माध्यमातून भाविकांना भक्तिरसाचा अनुभव देणार आहेत.
या सात दिवसीय सोहळ्यात दररोज भागवत कथा, हरिपाठ, कीर्तन, संगीत भजन व विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
कार्यक्रमाची सांगता १६ मार्च २०२६ रोजी महाप्रसाद व धार्मिक विधींसह होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन कुन्हाडे पाटील परिवार व आळंदी देवाची ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

1
25 views

Comment