logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेवगांव मध्ये लॉजवर आढळल्या पुन्हा ३ बांगलादेशी तरुणी, पोलिसांची मोठी कारवाई

शेवगांव प्रतिनिधी:-

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे गेवराई रस्त्यावरील हॉटेल राजयोग लॉज येथे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून महिलांच्या अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लॉज मालकासह सहा जणांविरुद्ध स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ तरुणींची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे या तरुणी बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे.
वानवडी (पुणे) येथील फ्रीडम फर्म या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते स्टीफन देविदास मस्कनळी यांना अहिल्यानगर जिल्ह्यात देहव्यापारासाठी एजंटांच्या मार्फत काही बांगलादेशी तरुणी आणल्या असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी अहिल्यानगर मध्ये येवून पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेत ही माहिती त्यांना दिली. पोलिस अधिक्षक घार्गे यांनी तात्काळ नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक हमीद शेख तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.या आदेशानुसार पो.नि. शेख यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील स. फौ. शकील शेख, महिला पो.हे.कॉ. अर्चना काळे, महिला पो.कॉ. छाया रांधवन यांच्या पथकासह बुधवारी (दि.४) सायंकाळी शेवगाव गाठले, तेथील हॉटेल राजयोग लॉज येथे एक बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि छापा टाकला. यावेळी त्या लॉज मध्ये ३ तरुणी आढळून आल्या. त्या बांगलादेशी असल्याचे चौकशीत समोर आले. पथकाने त्यांना ताब्यात घेत लॉज मालक बाबासाहेब रामभाऊ अंधारे, अजिंक्य विठ्ठल अंधारे (रा. शिवनगर, शेवगाव), अमोल पठाडे (रा. नेवासा)आणि अमर मारुती ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) कृष्णा बापू झिरपे (रा. कोळगाव, ता. शेवगाव), प्रतिक मिलिंद रांधवणे (रा. माळीवाडा, शेवगाव) यांच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १४१, १४३ (३) सह स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पिटा) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाजीराव सानप हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक गणेश उगले, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हमीद शेख, यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील स. फौ. शकील शेख, महिला पो.हे.कॉ. अर्चना काळे, महिला पो.कॉ. छाया रांधवन यांच्या पथकाने केली आहे.

79
3367 views

Comment