logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लग्नसराईत डल्ला मारणारी टोळी जेरबंद

जळगाव : लग्नसमारंभातील
फायदा घेऊन दागिन्यांची पर्स लांबवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. भुसावळ येथील बालाजी लॉनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या चोरीचा तपास लावत पोलिसांनीमध्यप्रदेशातून दोन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस पथकाने मध्यप्रदेशात तळ ठोकून रीतीक सिंकदर सिसोदिया आणि ऋषी पिता नीरज बेडिया या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान, त्यांनी चोरलेले दागिने त्यांच्या नातेवाइकांकडे ठेवल्याचे समोर आले.

10
375 views

Comment