logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पाथर्डी मधील मढी गावातील यात्रा विषयी माहिती


राजकीय नेते अरबो रुपयांच्या व्यवसायीक डील करत असतात. या डील करत असताना राजकीय नेते कधीही समोरच्या व्यक्तीचा धर्म किंवा जात पाहत नाहीत.

उलट ज्यांच्याविरोधात राजकीय नेते दिवस रात्र गरळ ओकत असतात त्यांनाच महत्वाची कामे आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या देताना राजकीय नेते दिसतात. हा राजकीय नेत्यांचा व्यवहारीकपणा आहे. वर्षभर शेकडो नेत्यांकडून अशा हजारो व्यावसायिक डिल होत असतात. पण असाच व्यावहारिकपणा सर्वसामान्य लोक दाखवू लागले तर राजकीय नेत्यांना ते आवडत नाही. राजकीय नेते स्वतःचे व्यवसाय एकदम आरामशीर करतात मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या व्यवसायाची राखरांगोळी करतात.

पाथर्डी मधील मढी गावातील यात्रा म्हणजे भटक्यांची पंढरी. मात्र या यात्रेला मागील वर्षीपासून गालबोट लावण्याचा प्रकार सुरू आहे. इथे पिढ्यानपिढ्या हिंदू मुस्लिम व्यावसायिक यात्रेच्या निमित्ताने तात्पुरती दुकाने टाकत असताना या यात्रेत मुस्लिमांनी दुकाने टाकू नये असा आग्रह राजकीय स्वार्थासाठी ब्राह्मणी विचारधारेला बळी पडलेले नेते करत आहेत. मात्र मढी गावातून याला अजिबात पाठिंबा नसल्याचे चित्र आज मढीमध्ये प्रत्यक्षात भेट दिल्यावर समजले. ही लोकं खूप प्रेमळ आणि मायाळू आहेत. आलेल्या लोकांची ते खूप काळजी घेतात.

मढीमध्ये साधारण ३० ते ३५ दुकाने फिरून ज्यावेळी दोन्ही धर्मियांच्या लोकांशी संवाद साधला त्यावेळी समजले की इथल्या लोकांना कानिफनाथ आणि आपला व्यवसाय सोडून बाकी कशातही स्वारस्य नाही. व्यवसाय करताना धर्माच्या आधारावर इथले लोक एकमेकांमध्ये भेदाभेद अजिबात करत नाहीत. इथे कुठले दुकान हिंदूंचे आणि कुठले मुस्लिमांचे हे समजत देखील नाही. दोन्ही व्यावसायिकांच्या दुकानात तुम्हाला सारखीच वागणूक मिळते. पण तरीही या लोकांना राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्या लोकांकडून जाणीवपूर्वक धर्मांधतेची नशा दिली जात आहे. आणि त्यांच्यात फूट पाडली जात आहे.

राजकीय नेते करोडोंच्या व्यावसायिक डिल करतील. मात्र गोरगरीब जनतेने एकमेकांकडुन ५० रुपयांची देखील खरेदी करू नये ? ही कुठली संस्कृती ? या लोकांनी व्यवसाय करू नये ? या लोकांनी चांगले आयुष्य जगू नये ?

गोरगरीब लोकांच्या व्यवसायात तोंड मारण्याची एवढीच खाज असेल तर महेश लांडगे, संग्राम जगताप, नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाने मढीच्या यात्रेत एक स्टॉल उभा करावा आणि या तिघांनी इथे रेवड्या, अष्टगंध, दोरा, गंधगोळी, रुद्राक्ष, साखर, फुटाणे अशा तत्सम वस्तू विकाव्यात. त्यातून मिळणाऱ्या पाच दहा रुपयांच्या फायद्याचे समाधान सर्वांसमोर मांडावे. करोडोंचे भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशामुळे तुमच्या सारख्यांना पैशाची किंमत राहिलेली नाही. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांचे उद्योग बंद करण्याचे धंदे सुचतात. असो...

आज पाथर्डी येथील मढीला भेट देऊन खूप आनंद झाला. राजाश्रयाच्या बैलगाडीखाली चालणाऱ्या श्वानांच्या थोड्या फार भीतीमुळे इथल्या बऱ्याच लोकांशी फोटो आणि व्हीडिओ न काढण्याच्या त्यांच्या एका शर्थीवर चांगला संवाद झाला. त्यांना भेटून मी एका गोष्टीवर ठाम झालो ते म्हणजे ही माणसे द्वेष पसरवणाऱ्या लोकांना भीक घालत नाहीत. राजकीय नेत्यांकडून टोकाचा द्वेष पसरवून देखील ही लोकं समता, बंधुता मानणारी आहेत. आपल्याला माणसे जोडता येत नसतील तर अशा लोकांना तोडू नका. तुम्ही कितीही ती तोडण्याचा प्रयत्न केलात तरीही ती आम्ही पुन्हा जोडू. #माणसं_जोडली_पाहिजे

- पैगंबर शेख
पुणे, महाराष्ट्र
९९७००७०७०५
[05/03, 6:34 am] devashishtokekar05: Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
478 views

Comment