logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिवप्रेमी नगर येथे तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार

मुंबई, दि. ४ मार्च २०२६ (वार्ताहर):

तिथीनुसार दरवर्षीप्रमाणे या ५८ व्या वर्षीही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी शिवप्रेमी मित्र मंडळ, शिवप्रेमी नगर, असल्फा पाईप लाईन, घाटकोपर, मुंबई यांच्या वतीने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.



या निमित्ताने सकाळी भक्तिभावाने श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे बालचमूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपूर्ण कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून देणारा जागर आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवता येणार आहे.

शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहून शिवजयंती उत्सव अधिकाधिक भव्य व यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

18
1072 views

Comment