logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नगर-मनमाडजवळ 4000 किलो मांगुर मासा जप्त...


नगर-मनमाडजवळ 4000 किलो मांगुर मासा जप्त...

शिर्डी (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) ह्या बातमीची हकीगत अशी की, श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत
आदेश दिलेले आहेत.सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके,शाहिद शेख, फुरकान शेख, राहुल डोके, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, सतिष भवर, चालक उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी पथकास रवाना केले.
नमुद पथक काल दिनांक 03/03/2026 रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत ट्रक नंबर WB25M5023 यामध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेले मांगुर मासे भरुन नगर-मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथुन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि/ सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावुन घेवुन निमगाव बायपास रोडवर सापळा रचुन ट्रक क्रमांक WB25M5023 हा ताब्यात घेवुन त्यामध्ये खात्री केली असता ट्रकचे केबिनमध्ये प्रतिबंधीत मांगुर मासे असल्याचे आढळुन आले. ट्रकमध्ये मिळुन आलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) स्वपन नियम डे वय-36 वर्षे,रा. बामनगज थाना दत्तपुकुर जि.बाराशाद,पश्चिम बंगाल, 2) मकबुल रौफ सरदार वय- 31 वर्षे रा. मसलंदापुर, निमतला तालुका गोवडमा जि. नॉर्थ 24 परगना, पश्चिम बंगाल, 3) कुतुब आयुब मंडल वय- 35 वर्षे रा. मंदीया थाना बदुडीया जि. नॉर्थ 24 परगना, पश्चिम बंगाल, 4) मृत्युंजय मुकुल विश्वास वय-27 वर्षे रा. हाबरा थाना हाबरा जि. नॉर्थ 24 परगना, पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांकडे त्यांचे ताब्यात मिळुन आलेले मांगुर मासे कोठुन आणले आहे व कोणाकडे घेवुन जाणार आहे याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचे मासे हे मिराज (पुर्ण नाव माहिती नाही) याने पश्चिम बंगाल येथुन भरुन दिलेले असुन ते खोपोली मुंबई येथे भाई (पुर्ण नाव माहित नाही) याचेकडे घेवुन जात असल्याची माहिती दिली.
त्यानंतर पथकाने प्रतिबंधीत मांगुर माशाने भरलेला ट्रक खात्री कामी शिर्डी पोलीस ठाणे येथे नेवुन मत्स विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांचेशी संपर्क करुन ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकमधील माशांची खात्री करणेकामी संपर्क केला असता सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांना दिनांक 03/03/2026 रोजी शिर्डी पोलीस ठाणे या ठिकाणी येवुन नमुद ट्रकमधील माशांची खात्री केली असता त्यामध्ये प्रतिबंधीत मांगुर मासे असल्याचा अभिप्राय दिला. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन 4,00,000/- रुपये किमतीचे 400 किलो प्रतिबंधीत मांगुर मासे व 25,00,000/- रुपये किमतीचा ट्रक असा एकुण 29,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रतिबंधीत मासे कायदेशीर प्रक्रिया करुन नाश करण्यात आले आहेत.
ताब्यातील इसमांविरुध्द मत्स विकास अधिकारी सौ.प्रतिक्षा सुधाकर पाटेकर,मत्सव्यवसाय विकास अधिकारी, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 275, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment