logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

व्हाईस ऑफ मीडिया तालुका उपाध्यक्ष अर्जुन पाटील खरात यांच्या वाढदिवसानिमित्त छोटासा आढावा

*संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील खरात*

*यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला एक छोटासा आढावा*

गेल्या वीस वर्षापासून संभाजी ब्रिगेड मध्ये सक्रिय आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार आदर्श व्यक्तिमत्व म्हणून अर्जुन पाटील खरात यांची ख्याती आहे गेल्या वीस वर्षांमध्ये संभाजी ब्रिगेड सोबतच पत्रकारिता क्षेत्रांमध्ये देखील त्यांनी मोलाचे योगदान दिलं आहे.एक आदर्श पत्रकार म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ख्याती आहे समाजसेवेचा वारसा चालवण्यासाठी आणि समाजसेवेची आवड असल्याकारणाने त्यांनी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेतून आपली वाटचाल सुरू केली मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम जी खेडेकर साहेब यांच्या विचारधारेवर चालणारे हे व्यक्तिमत्व असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वांना आपलंसं वाटणार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे मनाने अतिशय निर्मळ आणि स्वभावाने अतिशय प्रेमळ असणारे अर्जुन पाटील खरात यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळीच छाप आहे तसं बघायला गेलं तर राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार एका आगळवेगळे आदर्श म्हणून अर्जुन पाटील खरात यांच्याकडे बघितल्या जाते पळसखेडा गावामध्ये नव्हे तर संपूर्ण रिसोड तालुक्यामध्ये त्यांची एक वेगळी छाप आहे राजश्री शाहू बैंक आणि विविध कार्यकारी सोसायटीमध्ये रिसोड संस्थेचे तज्ञ संचालक म्हणून काम करतात आणि त्याचा फायदा इतरांना कसा होईल
हा त्यांचा उद्देश असतो.
प्रशासनामध्ये त्यांची एक वेगळी ओळख असून गोरगरीब जनतेसाठी ते सदैव कटिबद्ध असतात आतापर्यंत त्यांनी अनेक आक्रमक आंदोलने देखील केले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आपल्या अंगावर केसेस सुद्धा घेण्याचं काम अर्जुन पाटील यांनी केला आहे प्रशासनामध्ये एक वेगळी छाप असून गोरगरीब जनतेच्या कामासाठी ते नेहमी झटत असतात.समाजसेवेचा घेतलेला इडा शेवटपर्यंत खाली न ठेवण्याचा त्यांचा जो अट्टाहास आहे त्याला सलाम
हे सर्व काम करत असताना एक आदर्श शेतकरी म्हणून देखील त्यांची ओळख आहे आपल्या कर्तव्याशी आणि शेतीशी इमान राखत एक आदर्श कास्तकार म्हणून त्यांची जी ओळख आहे ते त्यावर सकारात्मकपणे काम करत असतात. आपल्या शेतामध्ये फार्म हाऊस बांधून शेतामध्ये स्वतः लक्ष देऊन संपूर्ण कामे करून चांगले उत्पन्न कसे होईल यावर त्यांची भर असते त्यांचा स्वतःचा दुधाचा व्यवसाय असून ते एका पेपरचे मालक एका बँकेचे संचालक एका संघटनेचे अध्यक्ष एका दैनिकाचे तालुक्याचे काम ते बघत असून हे सर्व असताना कुठल्याही प्रकारचा घमंड त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दिसत नाही सर्वांना हवेहवेसे वाटणारे आणि सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारे इतरांप्रती आदर ठेवणारे अर्जुन पाटील खरात यांना वाढदिवसाच्या पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना सदिच्छा देऊयात आणि थांबूयात..

5
220 views

Comment