logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

श्रीपूर येथे सामुदायिक विवाह सोहळा शिवतेजसिंह मोहिते पाटील सामुदायिक विवाह सोहळा काळाची गरज

श्रीपुर
सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे आर्थिकरष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार मिळतो, असे प्रतिपादन अकलूज नगरपरिषद उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले.
युवा नेते कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीपूर येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग भोसले यांनी सलग चौथ्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. यंदा १० वधू वरांच्या जोड्यांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्यात नवदांपत्यांना बेड, भांडी, रैंक, मुलींसाठी सोन्याचे मंगळसूत्र तसेच वधू वरांना सर्व कपडे व बूट आदी साहित्य मोफत दिले. सर्व पाहुण्यांसाठी जेवणाचीही उत्तम व्यवस्था केली होती. सामाजिक कार्याबद्दल बजरंग भोसले व त्यांचे वडील रमेश भोसले यांचे विशेष कौतुक शिवतेंनसिंह मोहिते पाटील यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. स्वयंप्रभादेवी उदयसिंह
सामुदायिक विवाह सोहळ्यात नववधू वरांसह शिवतेजसिंह मोहिते पाटील व अन्य मान्यवर.
मोहिते पाटील, ईश्वरीदेवी कीर्तीच्वजसिंह मोहिते पाटील, संचालक रामचंद्र सावंत पाटील, संचालक प्रकाश पाटील, डॉ. एम. के. इनामदार, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, निशांत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, महाळुंग श्रीपूर नगर परिषदच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, उपनगराध्यक्ष भिमराव रेडे पाटील, अरूण तोडकर, नागेश भोसले, अनिल जाधव, नगरसेवक राहुल रेडे पाटील, रावसाहेब सावंत पाटील, विजय गुंड पाटील, संचालक अमोल जोरवर पाटील, डॉ. हरीषचंद्र सावंत पाटील, अनिल मुंडफणे, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, नगरसेवक वानाजी भगत, नगरसेवक रतन रजपुत, सामाजिक नेते अल्लाबक्ष शेख,
नगरसेवक मोहसीन पठाण, देविदास काळे, राजरत्न नाईकनवरे, संदीप घाडगे, रोहित काळे, मौला पठाण, रमेश देवकर, शाम भोसले, नरेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत आयोजक बजरंग रमेश भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र भोसले यांनी तर आभार प्रदर्शन मा. संदीप लांडगे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. नरेंद्र भोसले, राजनंद नाईकनवरे, अक्षय भगत, संदीप लांडगे, आदित्य परकाळे, गणेश चांदणे, अल्ताब मुलाणी, हरी अडगळे, महेश गायकवाड, हर्षवर्धन अल्हाट, ज्ञानेश्वर कांबळे, आबा वजाळे, रेहान मुलाणी, प्रविण कारंडे, बाळा इंगळे, करण लांडगे, आकाश गोदे, सागर लांडगे आदींनी परिश्रम घेतले.

16
1208 views

Comment