logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

रमजान महिन्यातील लाईनची गैरसोय पूर्ववत.

चेअरमन प्रल्हाद दाभाडे यांच्या प्रयत्नांना यश.

रमजान महिन्यात नागरिकांना भेडसावणारी लाईन संदर्भातील गैरसोय आता पूर्णतः पूर्ववत करण्यात आली आहे.
म्हणजे ०२ वाजता येणारी लाईन आता पूर्वी प्रमाणेच १० वाजता येईल.
या मुळे रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.तसेच परिसरातील नागरिकांना रोजच्या व्यवहारांना अडचणी येत होत्या. मात्र या परिस्थितीची दखल घेत प्रल्हाद दाभाडे, चेअरमन यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने बोलून लाईन मुळे होणारी गैरसोय समजावून सांगून त्यांना कडक शब्दात सांगितले की लाईन पूर्ववत करण्यात यावी.
चेअरमन प्रल्हाद दाभाडे यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने उपाययोजना केल्यामुळे लाईनची अडचण दूर करण्यात आली असून सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. परिसरातील मुस्लिम नागरिकांनी रमजान महिन्यात झालेली लाईटची गैरसोय पूर्ववत झाल्यामुळे समाधान व्यक्त केले असून चेअरमन प्रल्हाद दाभाडे यांचे आभार मानले.
भविष्यातही अशा समस्या तात्काळ सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी प्रल्हाद दाभाडे म्हणाले.

14
72 views

Comment