आदिवाशी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडल रेशिडेन्शल स्कूल प्रवेश परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार ..!!!!
दि.०१/०२/२०२६:- २०२६ वर्षाच्या च्या फेब्रुवारी मध्ये झालेल्या एकलव्य मॉडल रेसिडेन्सल स्कूल प्रवेश साठी होणाऱ्या परीक्षा मध्य पालघर जिल्ह्यातील कांबळगाव बोईसर जवळील शाळेमध्य डहाणू एकात्मिक आदिवाशी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. डहाणू , तलासरी येथील अनेक आदिवाशी विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केले होते.
प्रवेश परीक्षा या इयत्ता ७ वी, ८ वी व ९ वी वर्गाच्या प्रवेश परीक्षा साठी झाली असून डहाणू व तलासरी येथील एकूण ६१० एवढे अर्ज आले होते . दापचरी येथील शाळेसाठी ४३६ , तर कांबळगाव बोईसर येथील शाळेमध्ये २३६ अर्ज आले होते. तर काही मुलांना परीक्षा संदर्भात माहीत नसल्याने ऐनवेळी काही अर्ज हे डहाणू एकात्मिक आदिवाशी विकास प्रकल्प कार्यालय यांनी स्वीकारुन त्यांना परीक्षेसाठी बसविण्यात आले . त्यासंदर्भात पालकांनी डहाणू एकात्मिक आदिवाशी विकास प्रकल्प कार्यालय यांचे आभार मानले आहेत.