logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दि. यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि. कराड शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल; ठेवीदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन

दि. यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि. कराड शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल; ठेवीदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन

फलटण, दि. ०२ मार्च : फलटण येथील दि. यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., शाखा कराड (जि. सातारा) येथे झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील ठेवीदार व गुंतवणूकदारांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

या बँकेचे व्यवहार सातारा, सोलापूर, पुणे, सांगली व लातूर जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या ठेवीदारांनी कराड शाखेत गुंतवणूक केली आहे किंवा आर्थिक व्यवहार केले आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पुढे येऊन जबाब नोंदवावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पुढे काय करावे?

गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी खालील बाबींची नोंद ठेवून पोलिसांशी संपर्क साधावा: १. मूळ ठेव पावत्या व ठेवींचे पुरावे, २. पासबुक, व्यवहाराची नोंद व स्टेटमेंट्स, ३. बँकेशी झालेला पत्रव्यवहार, ४. ओळखपत्र व आधार कार्ड प्रती, ५. गुंतवणुकीशी संबंधित इतर कागदपत्रे, सदर प्रकरणातील तपासासाठी दि. ०४ मार्च २०२६ ते दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १०.०० ते दुपारी २.३० या वेळेत सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणामुळे फलटणसह आसपासच्या भागात खळबळ उडाली आहे. स्थानिक ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, प्रशासनाने लवकरात लवकर सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
79 views

Comment