पंढरपूर तालुका पोलिसांची धमाकेदार कारवाई वाळू माफिया सुरज हरिभाऊ शिंदे वय 26 वर्ष यास MPDA कायद्यांतर्गत अटक
पंढरपूर तालुका पोलिसांची धमाकेदार कारवाई वाळू माफिया सुरज हरिभाऊ शिंदे वय 26 वर्ष यास MPDA कायद्यांतर्गत अटक
पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई वाळू माफिया सुरज हरिभाऊ शिंदे वय 26 वर्ष यास MPDA कायद्यांतर्गत अटक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडून एम पी डी ए महाराष्ट्र झोपडपट्टी दादा औषधी द्रव्य विषय गुन्हेगार वाळू तस्कर यांच्या कृत्यांना प्रतिबंध अधिनियम 1981 कलम 3 कायदया अर्तगत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हदीतील वाळु माफीया व सराईत गुन्हेगार सुरज हरिभाऊ शिंदे तालुका पंढरपूर यास एम पी डी ए कायदयाअर्तगत स्थानबध्द करून येरवाडा जेल येथे रवाना केले.
* इसमनामे सुरज हरिभाऊ शिंदे राहणार आणवली सोलापुर हा कुठल्याही प्रकारचा वैदय उदयोग धंदा अगर व्यवसाय करीत नाही. पंढरपुर तालुका हददीतील मौजे आझेवाडी, पंढरपूर, व शहर आसपासचे परीसरात भिमा नदी व माण नदी पात्रातुन वाळु चोरी करून त्याची विक्री करून त्यातुन मिळणारे पैशाचे जोरावर परीसरातील सर्वसामान्य जनतेत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याच्या कृत्यामुळे पंढरपुर तालुका व शहराचे आसपासचे परीसरातील सार्वजनिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणे भीतीचे वातावरण तयार करणे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रासदायक झाले होते. सुरज हरिभाऊ शिंदे याने पंढरपुर तालुका व शहराचे आसपासचे परीसरात दहशतीचे कृत्य करून त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा "वाळु तस्कर" म्हणुन स्वतःला सिध्द केले होते. सदर आरोपी यांचे विरुध्द पंढरपूर तालुका, व इतर पोलीस ठाणे अर्तगत एकुण 11 गुन्हे दाखल असुन त्यामध्ये सरकारी कामात अढथळा करणे, चोरी करणे, वाळु तस्करी करणे, व सर्व सामान्य लोकांमध्ये दहशत निर्मान करणे असे वेगवेळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते.*
*त्याअनुषंगाने सदर आरोपी विरुद्ध एम पी डी ए कायद्यांतर्गत कारवाई करणे व त्याच्या कृत्यांना आळा घाळणे अत्यंत आवश्यक असल्याने सुरज हरिभाऊ शिंदे वय 26 राहणार अनवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर जि सोलापुर यास एम.पी.डी.ए. कायदयाअतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी साो, यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साो सोलापूर यांना पाठविण्यात आलेला होता. दरम्यान मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साो सोलापूर यांनी एम पी डी ए कायदयातील तरतुदीनुसार आरोपी नामे सुरज हरिभाऊ शिंदे वय 26 वर्षे राहणार अनवली तालुका पंढरपूर जि सोलापुर याचे विरुध्द स्थानबध्दतेचा आदेश केलेप्रमाणे आरोपी यास ताब्यात घेवुन एम पी डी ए कायदयाअतर्गत कारवाई करुन त्यास
26 फेब्रुवारी 2026रोजी ताब्यात घेऊन अटक करून दिनांक 27फेब्रुवारी 2026 रोजी मध्य रात्री येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबध्द करणेकामी रवाना करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साो सोलापूर यांचे आदेशान्वये मा. पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी साो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रितम यावलकर साो, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साो पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप साहेब LCBसोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे
वरिष्ठ पोलीस निरिक्षक टी. वाय. मुजावर, API श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम पोसई भारत भोसले, पोसई विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक कवितकर पोसई . सहा. फौजदार विजयकुमार गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिस शेख स्थानिक गुन्हे शाखा पोहेकॉ/१४१५ मंगेश रोकडे, पोहेकॉ/१७९२ दिपक भोसले, पोलीस हवालदार सुहास देशमुख स्वप्निल वाडदेकर
पोकॉ/२११६ सागर गवळी, संजय गुटाळ चालक पोकॉ/७१९हासेन नदाफ, चालक पोकॉ विलास घाडगे/विजयकुमार आवटी, संतोष चव्हाण, पोलीस हवालदार तात्यासाहेब गायकवाड, सुजित उबाळेपाटील, बाजीराव काकडे, सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव, वसंत कांबळे यांचे पथकाने केली आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015