logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम संपन्न

गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम संपन्न

नांदेड : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल धोबी समाजाच्या वतीने आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प. स्वरा दीदी राजू देशमाने यांच्या ओजस्वी कीर्तनाने झाली. कीर्तनातून राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर जागर प्रसार करण्यात आला व समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी "कष्ट साधना पुरस्कार" देऊन डॉ. शिवराज गंगावळ यांच्या आई-वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कष्ट, संस्कार आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

जयंतीनिमित्त दरवर्षी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना कै. शिवाजीराव नागोराव इबितदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले. तसेच नांदेड शहरात गाडगे महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. बालाजीराव ईबितदार होते. यावेळी ओबीसी भूषण मा.सटवाजी माचनवार , नगरपरिषद संघटनेचे मा. रामेश्वरजी वाघमारे,मा. सुनील लोणवडे,मा. माधव बळेगावकर,मा.संघरत्न कांबळे, मा. रामचंद्र येईलवाड, प्रा. अनिल मोरे, मा. बजरंग तेलंग, मा. अविनाश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा योगेश अंबुलगेकर यांनी केले, प्रास्ताविक सचिन विभुते तर आभार अरविंद इबितवार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तानाजीराव इबितदार, मुकुंद तेलंग, बालाजी कापसे, अरविंद इबितवार, सचिन विभुते, पिंटू मारवाडीकर, सचिन इबिते मांजरमकर, कैलास तेलंगे, अमर कोंडराज, गंगाधर जाधव, आकाश इबिते, दत्ता तेलंगे, शंकर रामतीर्थकर, गजानन विभुते, विजय तेलग,शंकर कापसे, रवी वाघमारे, मोहन नायके, गंगाप्रसाद पवार, बद्रीनाथ पवार, आकाश पवार, परमेश्वर तेलंग, गजानन इबितदार, दिलीप तेलंगे, संतोष इबितवर, पप्पू हर्नाळ, देविदास तेलंगवाड, बालाजी आकुलकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची सांगता सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीप पाल महाराज यांच्या प्रबोधनपर मार्गदर्शनाने झाली. संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित आणि समाजएकतेचा संदेश देणारा ठरला.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
78 views

Comment