logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Israel attack Lebanon: हिजबुल्लाहचा उत्तर इस्रायलवर हल्ला; ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’अंतर्गत दुहेरी आघाडीवर लढाई Us Israel and Iran news: इराणनंतर आता लेबन

Israel attack Lebanon: हिजबुल्लाहचा उत्तर इस्रायलवर हल्ला; ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’अंतर्गत दुहेरी आघाडीवर लढाई
Us Israel and Iran news: इराणनंतर आता लेबनॉनवरही इस्त्रायलने हल्ला केला आहे.IDF strikes on Hezbollah Lebanon: शनिवारी (२८ फेब्रुवारी) सुरू झालेल्या इस्रायल आणि इराणमधील युद्धाने मोठे स्वरूप धारण केले आहे. या युद्धात अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्यामध्ये यूएई, बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणने लक्ष्य केले आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये देशभर सायरन वाजत असल्याची माहिती आयडीएफने दिली आहे. देशातील लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. अशातच इस्रायलवर आणखी एका देशाकडून हल्ला झाल्याची माहिती आयडीएफने दिली आहे.इस्रायलच्या आयडीएफने केलेल्या दाव्यानुसार, उत्तर इस्रायलमध्ये लेबनॉनमधील हिजबुल्लाहने हल्ला केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. पुढे आयडीएफने असेही म्हटले आहे की, हिजबुल्लाह इराणी राजवटीच्या वतीने काम करत असून ते इस्रायली नागरिकांवर गोळीबार करत आहेत. त्यांच्या बाजूने सातत्याने गोळीबार सुरू आहे. ते विनाकारण स्वतःच्या (लेबनॉनच्या) विनाशाला कारणीभूत ठरत आहेत, असेही आयडीएफने म्हटले आहे.

लेबनॉनच्या हिजबुल्लाहकडून झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. सध्या इस्रायल इराण आणि लेबनॉनविरोधात दोन आघाड्यांवर लढत आहे. लेबनॉनला दिले जात असलेले प्रत्युत्तर ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’चा भाग असल्याची माहिती आयडीएफने दिली आहे. या परिस्थितीसाठी आम्ही पूर्वीपासून सज्ज होतो आणि सर्व आघाड्यांवर लढण्यासाठी तयार आहोत, असेही आयडीएफने स्पष्ट केले

0
77 views

Comment