logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धुळ्यात भरबाजारात गुंडाची धिंड



धुळे : शहरातील मिल परिसरात एका

तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत माजविणाऱ्या साहिल केदार नावाच्या गुंडाची धुळे शहर पोलिसांनी २७ रोजी रात्री धिंड काढली. गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि परिसरातील दहशत संपवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.



-

तेजस बागुल या तरुणावर केदार ३०० याने प्राणघातक हल्ला केला होता. केवळ मारहाण करून न थांबता, आरोपीने तेजसकडून जबरदस्तीने रुपयेदेखील काढून घेतले होते. बागुल याच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साहिल केदार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीदेखील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो वारंवार गुन्हे करत असल्याने त्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत होते. यासाठी पोलिसांनी दि. २७रोजी रात्री अटक करून धिंड काढली.

5
58 views

Comment