logo

खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत

कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा प्रचंड खर्च थांबवण्यासाठी व सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे.

यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. या निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना निर्देश देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

106
15116 views