logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

रांझणी-आलेगावमार्गे टेंभुर्णी-अकलूज बससेवा सुरू करावी संजय कोकाटे यांची परिवहनमंत्री यांच्याकडे मागणी

रांझणी-आलेगावमार्गे टेंभुर्णी-अकलूज बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात संजय कोकाटे यांनी पुढे म्हटले आहे की, माढा तालुक्यातील कोंढार भागातील सुमारे १५ गावांना सध्या दळणवळणाचे कोणतेही सक्षम साधन उपलब्ध नाही. टेंभुर्णी किंवा अकलूज येथे जाण्यासाठी नियमित बससेवा नाही.
टेंभुर्णी येथून बस रांझणी, आलेगाव बुद्रुक, रुई-आलेगाव खुर्द, गारअकोले मार्गे व्हाया बावडा ते अकलूजपर्यंत आणि पुन्हा त्याच मार्गाने परतीचा प्रवास करावा, याप्रमाणे करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यास ग्रामीण
टेंभुर्णी : संजय कोकाटे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले.
कोंढार भागातील नागरिकांची शैक्षणिक, वैद्यकीय व व्यापारी कामांसाठी मोठी सोय होईल. यासाठी प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे.

0
81 views

Comment