logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा परिषद शाळेत विज्ञानाचा जागर; चिमुकल्या शास्त्रज्ञांनी मांडले नाविन्यपूर्ण प्रयोग!

जिल्हा परिषद शाळेत विज्ञानाचा जागर; चिमुकल्या शास्त्रज्ञांनी मांडले नाविन्यपूर्ण प्रयोग!
दिनांक: २८ फेब्रुवारी २०२६
फुक्किमेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन' उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेले विविध प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सौर ऊर्जा, प्रदूषण नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी दिलेले संदेश विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले.
प्रदर्शनाचे उद्घाटन मा .सौ.गीताताई हुकरे
अध्यक्षा शा.व्य.स.फुक्कीमेटा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.सौ. सुरेखाताई बारसे सदस्या ग्रा. पं., मा.श्री विजेशजी ब्राह्मणकर शा.व्य.स. ,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शा.व्य. स.,माता पालक संघ,शिक्षक पालक संघ ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात भरलेल्या या प्रदर्शनात एकूण 24 हून अधिक प्रकल्प मांडण्यात आले होते.
विज्ञानातील कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने कशा समजून घेता येतील, याचे उत्तम उदाहरण या विद्यार्थ्यांनी दिले. विशेषतः 'स्वयंचलित पथदिवे' आणि 'पाणी शुद्धीकरण' या प्रयोगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी प्रतिभा आहे. अशा प्रदर्शनांमुळे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळते," असे मत मुख्याध्यापक श्री डी.आर. धानगाये यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विज्ञानाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री संजय कापगते विज्ञान शिक्षक,प्रकाश गावडकर,संतोष राऊत सर,सौ.चित्रकला बिसेन मॅडम,मेंढे मॅडम विशेष परिश्रम घेतले.

60
3272 views

Comment