logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विषय :- " पवित्र कुरआन सर्व सृष्टी व मनाव कल्याणासाठी मार्गदर्शक "


रमजान मुबारक 2026
रोजा नंबर 10 वा.
शनिवार, दिनांक 28-02-2026

विषय :- " पवित्र कुरआन सर्व सृष्टी व मनाव कल्याणासाठी मार्गदर्शक "

" रमजान हा तो महिना आहेत त्या महिन्यात कुर आन अवतीर्ण करण्यात आला, जें मार्गदर्शन आहेत मानवजातीसाठी आणि मार्गदर्शनाचे सुस्पस्ट प्रमाण आणि सत्य व असत्या दरम्यान करणारी कसोटी आहेत " ( दिव्य कुरआन, सुरहा अल बकरा आ. नं. 185).
"आम्ही याला ( कुरआन ) ला कद्र च्या रात्रीं अवतारलं आहेत "(दिव्य कुरआन, सुरहा अल कद्र आ. नं. 01).
कोणत्याही वस्तूचा निर्माता वस्तूची कार्यशैली निश्चित करूनच निर्मिती करतो, त्या वस्तू हाताळायांची कशी याची मार्गदर्शक पुस्तिका (म्यानुयल ) तय्यार करतो, भुतलावर मनुष्यची निर्मिती सर्वोच्च आहेत. " आम्ही मानवाला उत्तम आकार देऊन (उत्कृष्ट निर्मितीच्या रूपाने ) निर्माण केले " दिव्य कुरआन सुरहा आत - तीन आ. नं. 04).म्हणून अल्लाह ( ईश्वर) नें मानवाने जीवनाचा उद्देश, लक्ष, आणि साध्य दर्शवण्यासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका दिली त्याला ईशग्रंथ म्हणतात अर्थात दिव्य कुरआन, हो ईशग्रंथ दिव्य पवित्र कुरआन.
पैगंबर मुहम्मद स्व. यांना अल्लाह ( भगवंता) नें जन्मच सदाचारणं- सद व्यवहार - सद वर्तन - सद मार्गदर्शन करण्यासाठीच दिला असं त्यांच्या पैगंबर होण्याच्या अगोदर पासूनच दिसतं होतं, वाळवंटी अरबस्थानातील भयानक परिस्थिती पाहून त्यांच्या मनात कालहाल होत होती म्हणून ते वयाच्या 25 वर्षा पासून मक्का च्या थोडं बाजूलाच असलेल्या ओसाड डोंगराच्या" गार हिरा " गुहेत रात्रंदिवस अल्लाह ( भगवंत) नामस्मरण चिंतन मनन कित्येक दिवस काढत, एके दिवस अचानक अल्लाह चे ईशदूत ( फारिश्ता ) हजरत ( सन्माननिय ) जिब्राईल स.प्रकट होऊन त्यांना जोरात घट्ट मिठी मारून म्हणाले, " वाच ! आपल्या पालनकर्त्याच्या नावाने ( आरंभ करून )ज्याने सर्वांनां निर्माण केलें. दिव्य कुरआन सुरहा नं 96,अल - अलक आ. नं. 01,)ज्याने मानवाला गोठलेल्या ( ए क्लॉट ऑफ ब्लड -रक्तापासून )निर्माण केलं, ( 02), पुन्हा, म्हणाले, वाच ! तुझ्या पालनकर्त्याच्या जो नावाने जो फार उदार आहे. ( 03), ज्याने मानवाला ज्ञानप्राप्तीसाठी लेखणीचा उपयोग करणं शिकवले ( O4), मानवाला ते सर्व शिकवले, ते त्यास माहित नव्हते. 05)..!!!.
शिकवलं, हीं, दिव्य कुरआन ची पहिली आयात (स्लोक )आहेत,
त्या वेळी आदरणीय मुहम्मद - अहमद चे प्रेषित- पैगंबर -नबी - झाले, पैगंबर प्रेषित मुहम्मद स्व. झाले. त्यावेळी त्यांचं वय चाळीस होतं. दिव्य कुरआन अवंतरलं एका अशिक्षित- निरीक्षर पैगंबर मुहम्मद स्व. वर.हा एका चमत्काराचाच व भाग्याच म्हणावे.
त्या गार गुहेतून पवित्र कुरआन चे अवतरन अरबी भाषेत कधी एक स्लोक (आयात ) तर संपूर्ण सुरहा, असं जशी -वेळ -काळ -परिस्थिती -आणीबाणीची परिस्थिती असं विविध वेळी त्या त्या परिस्थितीच्या मार्गदर्शन करण्यासाठी थोडं थोडं सतत 23 वर्षे येऊन पैगंबर मुहम्मद स्व. च्या महानिर्वाना च्या अगोदर केलेल्या शेवटीकेलेल्या हज्ज पर्यंत अवतरन चालू होतं.
विशेष गोष्ट म्हणजे प्रेषित मुहम्मद स. निरक्षर असून ते ते सर्व आयात तोंड पाठ करून आपल्या मित्रां (सहाबा )ना अयेकवायचे ( बोलून ). कालांतराने त्या सर्व स्लोक आयती मित्र (सहाबा ) लिहून अथवा तोंड पाठ करून ठेवायचे.. असें जवळपास 42 विविध प्रकारे साठवून ठेवलेले आज पर्यंत आहेत.. असो.
23 तेवीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत थोडं थोडं करून अवतरन झाले तरी त्यात कसलेही मतभेद किंवा विरोधाभास अथवा अतिरंजित नाहीं. दिव्य पवित्र कुरआन 30 तीस खंडात विभागण्यात आला आहे, त्यामध्ये 114 एकशे चौदा अध्याय आणि 6236 सहा-हजार- दोन शे- छतीस आयाती अर्थात स्लोक आहेत. याची भाषा शैली अरबी भाषेतील सर्वोत्कृष्ट नमुना असून अत्यन्त सरल मधुर - काव्यमय आहेत.कुराण ज्ञानाचे मूळ स्रोत आहे, अनुपम वर्णन शैली, मनमोहक मांडणी. दिव्य कुरआन वाचताना वाचकाला असा भास वाटतोय की सृष्टी चा निर्माणकर्ता अल्लाह ( ईश्वर -भगवंत ) स्वतः आपल्याशी संवाद साधत आहे.खरोखरचं स्वतः मार्गदर्शन करत आहेत. पुन्हा विशेष म्हणजेच दिव्य कुरआन कधीहीं कितीही वेळा वाचले तर प्रत्येक वेळा काहीतरी नवीन वाचलं किंवा नवीन ज्ञान भेटल्या सारखं वाटतं. कुराण च्या कुठल्याही अध्याय उघडून वाचला तर प्रकर्षाने प्रत्येक पाठावर आपल्याला चिंतन - विचार - आणि ज्ञानाचा अथांग सागर मिळेल. त्यामध्ये ज्ञान विज्ञानाशी सुसंगत, उत्कृष्ट अध्यात्मिक व वैज्ञानिक गोष्टीचा संगम आहेत.
दिव्य कुरआन मानवी उत्पत्तीपासून सृष्टीच्या उत्पत्ती, जमीन, आकाश,अवकाश,सप्तपातळ - सप्त आकाश एवढंच नाहीतर आंतरिक्ष- अंतविश्व या विषय अनेक गोष्टीनां स्पर्श करून त्याचे तारकीक विवेचन केलेले आहेत. भौतिकशास्त्र, वनस्पती शास्त्र, भुगर्भ शास्र, आंतरिक्ष शास्त्र, मनाव वंश शास्त्र, अर्थशास्त्र जीवन शास्त्र, कृषी फलोद्यानशास्त्र, इत्यादी बाबतीत अधभूत सत्य मांडली आहेत.
पवित्र कुरआन नें दिलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे आधुनिक ज्ञान विज्ञान चा मार्ग प्रशस्त झाला आहेत. अर्थातच कोणत्याहीआधुनिक काळात दिव्य कुरआन मार्गदर्शन करतो.
पवित्र कुरआन चा केंद्र बिंदू हा मनाव आहेत, मानव कल्याण हाच त्याचा उद्देश आहेत. मानवी जीवनाचा उद्देश काय तर सदाचारी जीवन जगणं व दुराचाराला नष्ट करने.कुरआनच्या शिकवनीत परकोटीचं संतुलन असून त्यात अध्यात्मिकतेची आवश्यक तत्थे आणि जीवनव्यवस्थेंचे नियम, नैतीकता शिष्टाचाराचे विश्लेषण भरपूर आहे, उपसणे संबंधित विस्तृत माहिती, कौटुंबिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक, तसेच राजनैतिक आज्ञा आहेत, युद्ध व युद्धातील शिष्टाचार आणि कायदे नियम आहेत, अर्थातच मानवी जीवनाशी निगडित सर्वाथाने सर्वस्पर्शी. मानवी जीवनातील सर्व पैलूच्या सर्व समस्सेला समाधानिक उत्तम समाधान.
दिव्य कुर आन मध्ये, " निससंदेह प्रत्येक समस्येला समाधान आहेत, निच्छितच प्रत्येक समस्सेला समाधान आहेत " सुरहा 94, आ. नं. 6 व, 7 ).
कुर आन हें समस्त ( सर्व,) मनाव जातीला मार्गदर्शन तसेच सत्य व असत्य दरम्यान फरक करणारी कसोटी आहेत, " सुरहा नं 02, अल -बकरा आ नं 185)...
( मित्रांनो लेख आवडला तर मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा.. त्यांना हीं फायदा होईल.. प्रतिक्रिया कळवा ).
लेखन, डॉ. सलीम शाहिदा सिकंदर शेख.
बैतुशशिफा मल्टिस्पेसिअलिटी दवाखाना
श्रीरामपूर
मोबाईल :- 9271640014

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
39 views

Comment