जळगांव येथील मिल्लत हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या सेवेसाठी व्हावा – मुख्याध्यापकांचा संदेश
जळगांव
दिनांक ०१/०३/२०२६
भारतातील महान शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांनी शोधलेल्या ‘रमन परिणाम’ (Raman Effect) या संशोधनाच्या स्मरणार्थ दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. मिल्लत हायस्कूलमध्ये ‘नॅशनल सायन्स डे’ दिनांक २८/०२/२०२६ शनिवार रोजी मोठ्या साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विज्ञान विभागाचे प्रमुख साजिद खान यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत ‘रमन परिणाम’ म्हणजे काय आणि प्रकाशाच्या विखुरण्यामागील विज्ञानातील कोणती रहस्ये दडलेली आहेत, याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक शेख हफीज मन्यार यांनी आपल्या भाषणात डॉ. सी. व्ही. रमण यांना अभिवादन करून सांगितले की, विज्ञानाचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी व्हायला हवा.
या वेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक मॉडेल्स व चार्ट्सचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. सर्व विज्ञान शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
================